रोटरी इंटरनॅशनल एक आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटना आहे. १९०५ साली स्थापन झालेली संस्था आज जगभरात २०० हून जास्त देशात शिस्तबध्द वार्षिक नियोजनाद्वारे चालविली जाते. आरोग्य, शिक्षण, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सद्भावना या क्षेत्रात प्रामुख्याने संघटना काम करते. पोलीओ निर्मूलनाचे शिवधनुष्य संस्थेने यशस्वीपणे पेलले आहे. रोटरी इंटरनॅशनल हे एक मनुष्याच्या जीवनातील प्रकाशाचे बेट असून या संस्थेने अनेक सामाजिक प्रश्न सोडविलेले आहेत. १० एप्रिल १९७८ रोजी स्थापन झालेली रोटरी क्लब सातारा कॅम्प ही संस्था रोटरी इंटरनॅशनलचा घटक आहे. यामध्ये प्रामुख्याने उद्योजक, व्यावसायिक, नोकरदार सभासद आहेत. विविध समाजोपयोगी कार्यात संस्था आपला ठसा उमटवित आहे.